आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Celebrate Because Alcohol Ban Issue At Amravati

वडाळीत दारूबंदीचा आनंदोत्सव, यशाने बळावला महिलांमधील आत्मविश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशीदारू दुकान हद्दपार केल्यानंतर महिलांकडून वडाळीत शुक्रवारी (दि. १९) आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाण्याच्या टाकीवर वीरूगिरी करीत लक्षवेधक आंदोलन करीत प्रशासनाला नमवले. प्रशासनाकडून जनहिताची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्याने उच्च न्यायालयाने देखील दारू दुकान संचालक प्रभू झांबानी यांची याचिका फेटाळली.

वडाळी येथील देशी दारू दुकान हद्दपार करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून महिलांचा लढा सुरू होता. विविध प्रकारचे आंदोलन केल्यानंतर देखील दुकान हद्दपार होत असल्याने महिलांनी रौद्र रूप धारण केले. फेब्रुवारी महिन्यातील निवडणूक प्रक्रिया उधळूण लावली होती. पुन्हा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, याबाबत महिलांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. आगामी २८ डिसेंबरला निवडणूक घेण्याबाबत महापालिकेच्या झोन क्रमांक या कार्यालयातून अधिसूचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, निवडणूक होऊ नये म्हणून आंदोलनाची तीव्रता वाढवली, दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आल्यानंतर अखेर आंदोलनाला यश आले. अनेक वर्षांच्या आंदोलनामुळे मिळालेल्या यशानंतर आज वडाळीत फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.