आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षणासाठी रस्त्यावर अवतरल्या ‘मर्दानी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महिलांच्यासुरक्षिततेसाठी अाता पाेिलस दलातील दहा कराटे प्रशिक्षित महिला कर्मचारी शहरातील विविध भागांत गस्त घालणार अाहेत. उत्सवांचा काळ सुरू झाला असून, गणेशोत्सव दुर्गोत्सवात तरुणी, महिला मोठ्या संख्येने दर्शनासाठी शहरातील विविध भागांत फिरत असतात. या पार्श्वभूमीवर पोिलस आयुक्तालयाने हा निर्णय घेतला असून, चार्लीप्रमाणे दुचाकीवरून या ‘मर्दानी’ शनिवारपासून शहरात गस्त घालताना दिसणार अाहेत.

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी पोलिस दलातील तरुणींना कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. दहा दिवसांपूर्वी आयुक्तालयातील ३४ महिला तरुणींना कराटेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. यातील दहा महिला कर्मचाऱ्यांवर गस्त घालण्याची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. अागामी काळात याची संख्या वाढणार अाहे. सध्या या ‘मर्दानी’ गाडगेनगर, शहर कोतवाली, राजापेठ आणि खोलापुरी गेट ठाण्यांच्या हद्दीत दुपारी चार ते रात्री दहा या वेळेत दुचाकीने गस्त घालत आहेत.

गर्दीच्या ठिकाणी लक्ष
पुरुष चार्लीसोबत महिला चार्ली गस्तीवर असाव्यात म्हणून पोलिस आयुक्त डॉ. मेकला यांनी हा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून दहा महिला चार्ली कमांडो शहरात गस्त घालतील. गणेशअणे, जनसंपर्कअधिकारी, पोलिस आयुक्तालय कार्यालय.