आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी वडाळीत महिलांचे ‘शोले’ स्‍टाईल आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशीदारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी अख्खा दिवस पाण्याच्या टाकीवर काढलेल्या वडाळी येथील महिलांना अखेर न्याय मिळाला. उच्च न्यायालयाने प्रभू झांबानी यांची याचिका डिस्पोज केल्याने तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून देशी दारू दुकान हटविण्याबाबत लिखीत आश्वासन मिळाल्याने महिलांनी गुरुवारी(१८ डिसेंबर) आंदोलन मागे घेतले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आंदोलनाला यशाची झालर लाभल्याने वडाळी येथील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

मतदान घेण्यास तीव्र विरोध करीत कोणत्याही स्थितीमध्ये देशी दारु दुकान हद्दपार करण्यासाठी दोन दिवसात निर्णय घेण्याचा अल्टीमेट महिलांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. दोन दिवसांचा अवधी संपला मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतेही पत्र प्राप्त झाल्याने वडाळी येथील महिलांनी पुन्हा आंदोलन आरंभ केले. प्रशासनाला गुंगारा देत गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता आठ महिला येथील रोप वाटीकेसमोर असलेल्या मजीप्राच्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. महिलांना समजवण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सातत्याने केला जात होता. मात्र कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता सायंकाळी वाजेपर्यंत महिलांनी त्यांची आक्रमकता कायम ठेवली.

महिलांकडून इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले ही अख्खा दिवस गेल्यानंतर देखील पोलिस प्रशासनाला कोणतीही कारवाई करता आली नाही. पोलिस किंवा नागरिकांनी पाण्याच्या टाकीजवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या दिशेने भिरकावण्यासाठी महिलांनी आधीच वर दगड नेऊन ठेवले होते. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने अधून-मधून महिलांकडून रौद्र रूप देखील धारण केल्या जात होते. मध्यंतरी टाकीवर ठिय्या देत असलेल्या आठ पैकी दोन महिलांकडून खाली झोकावून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला.
सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास आठ महिला वडाळी रोप वाटिका जवळील मजीप्राच्या पाण्याच्या टाकीवर चढल्या. टाकीवर जाण्याच्या कुलूप असल्याने घरून सिडी आणून महिला चढण्यास यशस्वी झाल्या. अख्खा दिवस महिलांनी पाण्याच्या टाकीवर काढला. टाकीवर चढत आंदोलन करीत असताना चौफेर नजर राखण्याची कसरत देखील त्यांना करावी लागत होती. अधून-मधून आक्रमक झालेल्या एखाद आंदोलनकर्तीला सांभाळण्याची जबाबदारी देखील त्यांना सांभाळावी लागत होते.
आंदोलनाची पार्श्वभूमी
वडाळीतप्रवेश करताच सुरुवातीला देशी दारुचे दुकान नजरेस पडत होते. सर्व साधारण वस्ती असल्याने देशी दारुचे दुकान बंद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र डिसेंबर २०१२ मध्ये याबाबत सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संघर्षास सुरुवात झाली अन् महिला आंदोलनात उतरल्या. प्रशासनाने १६ फेब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बोगस मतदार किचकट प्रक्रियेमुळे महिलांनी मतदान उधळून लावले होते. तेव्हापासून दुकानाला सील आहे. देशी दारु हटविण्याबाबत महिला इतक्या जिद्दी पेटल्या की कोणत्याही परिणामासाठी त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्‍यानंतर गुरुवारी वडाळीतील महिलांनी पाण्याच्या टाकीवर शोले स्टाइल आंदोलन करत प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले.

न्यायालय, प्रशासनाचे आभार
-अनेकदिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. देशी दारु दुकान हद्दपार करण्याबाबत प्रशासनासह न्यायालयाने देखील जनभावनांची दखल घेतली. त्यामुळे महिलांच्या वतीने न्यायालय प्रशासनाने आम्ही आभारी आहोत. दारुच्या व्यसनामुळे येथील संपूर्ण पिढी उध्वस्त होणार होती. मात्र निर्णयामुळे भावी पिढीला संरक्षण मिळण्यास मदत मिळेल. पुष्पाघुले, आंदोलनकर्त्या.

संघर्षालाअखेर न्याय मिळाला
-अनेकदिवसांच्या संघर्षाला अखेर न्याय मिळाला. प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या फेब्रुवारी महिन्यातील निवडणुकीकरिता संपूर्ण महिलांनी आनंदाने होकार दिला होता. मात्र मतदान यादीमध्ये घोळ करीत बोगस मतदानाचा झाले. नव्याने निवडणूक घोषित करण्यात आली होती. यामध्ये देखील घोळ होण्याची अधिक शक्यता असल्याने निवडणूक नकोच ही भूमिका होती. दिपालीधस्कट, आंदोलनकर्त्या.