आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यशाळेला गेलेल्‍या महिलांना मुंबईची वारी पडली भारी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बचत गट महिलांच्या कार्यशाळेच्या निमित्ताने शुक्रवारी (दि. 20) अख्खी महापालिका मुंबईत राहणार आहे. महापौर, उपायुक्तांसह, पदाधिकारी व अधिकारी ‘मुंबईवारी’वर असल्याने नागरिकांची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय लाइव्हलीहूड मिशन’अंतर्गत मुंबईतील ताज हॉटेल व वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे बचत गटातील महिलांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त अरुण डोंगरे, उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे, उपायुक्त रमेश मवासी, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, गटनेते, मिनी महापौर व विषय समिती सभापतींचा दौर्‍यामध्ये समावेश आहे.
परिणामी, पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या गैरहजेरीमुळे मूलभूत प्रश्नांसाठी येणार्‍या नागरिकांना आल्यापावली परतावे लागणार आहे. महापालिकेत नोंदणी असलेल्या बीपीएल बचत गटातील 200 महिलांची कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. बचत गटांच्या महिलांसाठी असलेल्या कार्यशाळेला पदाधिकारी व विभाग प्रमुखांची वर्णी लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रश्नावरून आमसभेत या विषयावर घमासान होण्याची शक्यता आहे.
आमसभेत होणार घमासान
कार्यशाळेसाठी बीपीएल बचत गटातील महिलांच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. नगरसेवक भूषण बनसोड, प्रा. प्रदीप दंदे यांच्याकडून याबाबत आमसभेत प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. आगामी आमसभेत या विषयावर घमासानाची शक्यता आहे.