आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women's Savings Groups,Latest New In Divya Marathi

महिला बचतगट वारी, शासनावर भारी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महिला बचतगटाची मुंबई वारी शासनाला भारी पडणार असल्याचे संकेत आहेत. या वादग्रस्त विषयावर नगरसेवक आमसभेत प्रश्नांची सरबत्ती करणार आहेत. बचतगट व महिलांची निवड, झालेला खर्च यांबाबत सदस्यांकडून आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद संचालनालयाच्या वतीने मुंबई येथील हॉटेल ताज व वर्ल्ड सेंटर येथे महिला बचतगट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 20 जून रोजी झालेल्या कार्यशाळेसाठी महापालिका क्षेत्रातील दारिद्रय़रेषेखालील शंभर बचतगटांची निवड करण्यात आली होती. या शंभर बचत गटांतून प्रत्येकी दोन अशा 200 महिला थोड्याच दिवसांपूर्वी मुंबई येथील कार्यशाळेला हजेरी लावून आल्या. कार्यशाळेसाठी महिलांची निवड करताना अनेक बचतगटांसोबत दुजाभाव झाल्याची माहिती समोर आली होती. शिवाय बेलपुरा भागातील एकाच बचतगटातील अनेक महिलांची कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती. एकाच बचतगटातून केवळ दोन महिलांचा समावेश असणे बंधनकारक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नगरसेवक प्रा. विजय नागपुरे यांनी याबाबत आमसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रीय लाइव्हलीहूड मिशन अंतर्गत झालेल्या मुंबई येथील कार्यशाळेची सविस्तर माहिती त्यांनी मागितली आहे.

किती बचतगटांची निवड करण्यात आली, निवड प्रभागनिहाय होती का, अल्पसंख्याक किंवा इतर सर्वसाधारण बचतगटांना समाविष्ट करण्यात आले का, कार्यशाळेचा खर्च महापालिकाद्वारे करण्यात आला काय, नगरसेवकांना याबाबत माहिती देण्यात आली होती का, या प्रश्नांचा समावेश प्रा. नागपुरे यांनी केला आहे. नगरसेवक भूषण बनसोड यांनी पूर्वीच याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे.