आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Breastfeeding Week,Latest News In Divya Marathi

स्तनपान हे अमृत; इर्विनमध्ये जागतिक स्तनपान सप्ताहास प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘स्तनपान आई आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळासाठी ते अमृत आहे. त्यामुळे आरोग्य शिक्षणाकडे समाजात दुर्लक्ष करून चालणार नाही. स्तनपान व ओआरएसचे महत्त्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे,’ असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक पाचमध्ये जागतिक स्तनपान व ओआरएस सप्ताह शनिवारपासून (दि. 2) सुरू करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
स्तनपानाचे फायदे, स्तनपानाच्या पद्धती व विविध गैरसमज यांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हासामान्य रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागातर्फे स्तनपान व ओआरएस सप्ताह राबवण्यात येत आहे. या निमित्त रुग्णालयात शनिवारी माहितीपर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. तज्ज्ञांनी या वेळी माता व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अरुण राऊत पुढे म्हणाले की, बाहेर नोकरी तसेच काम करणार्‍या मातांनी स्तनपानाकडे दुर्लक्ष करू नये. बसस्थानकांवर स्तनपानासाठी असलेल्या हिरकणी कक्षांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक वनकर यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. बालरोगतज्ज्ञ डॉ. हृषिकेश नागलकर, डॉ. र्शीपाद जहागीरदार, डॉ. भूपेश भोंड, डॉ. अभय राठोड यांच्यासह तज्ज्ञांनीही या वेळी मार्गदर्शन केले. बाळाचा जन्म झाल्यावर अध्र्या तासानंतरच स्तनपान का करावे, बाळाला भूक लागली हे आईने कसे ओळखावे, स्तनपानाचे फायदे काय अशा विविध महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. ओआरएस (जलसंजीवनी) घरी कशी तयार करता येईल? डायरियामध्ये त्याचे महत्त्व काय, याची माहितीही या वेळी देण्यात आली. डॉ. रश्मी नागलकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अजय ठाकरे, ललिता अटाळकर, स्मिता तायडे, नलिनी भारसाकळे, पुष्पा राऊत, मुक्ता खोंड, मंदा गाडवे आदींची उपस्थिती होती.