आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक पर्यावरण दिनविशेष, तापमान वाढीमुळे जीवसृष्टीला निर्माण होत आहे धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मागील ५० वर्षांत पृथ्वीवरील तापमानात सातत्याने होणारी वाढ आणि पर्यावरणातील अनपेक्षित बदल यामुळे आगामी काही वर्षांमध्ये पृथ्वीवर वावरणाऱ्या जीव सृष्टीला धोका संभवण्याची शक्यता असल्याचे खगोल अभ्यासकांचे मत आहे.

सध्याच्या वाढीनुसारच पृथ्वीच्या तापमानात वाढ कायम राहिली तर १०० ते १५० वर्षांनी पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल, असे मत हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी व्यक्त केले आहे. गिरूळकर यांच्या म्हणण्यानुसार, जीवसृष्टी नष्ट होण्याच्या धोक्याला जगप्रसिद्ध वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे येत्या ते वर्षात अंटांर्टिकावरील संपुर्ण बर्फ वितळेल. यामुळे समुद्रकाठी असलेल्या शहरांना धोका निर्माण होईल. २१ जुलै १९९४ ला शुमेकर लेव्ही या धुमकेतूने गुरू ग्रहाला टक्कर दिली होती. यामुळे गुरूचा पृष्ठभाग काळा झाला आहे. तर २० ऑगस्ट २०२६ रोजी स्विफ्टटटल हा अवाढव्य धूमकेतू पृथ्वीला टक्कर देऊ शकतो, असे गिरूळकर यांचे म्हणणे आहे.
पृथ्वीला उल्कांपासून आहे धोका
आगामी काळात अशनी(उल्का) पृथ्वीवर कोसळू शकते असे गिरूळकर यांचे निरीक्षण आहे. यामुळे तर मोठा धोका संभवू शकतो. अशनी म्हणजेच उल्कांचा ताशी वेग हा ७२ हजार ते लक्ष हजार किलोमीटर एवढा असू शकतो. अशनी जर समुद्रात कोसळली तर लाटा उसळतात. आणि जमिनीवर कोसळली तर विवरे तयार होतात. यामुळे धुळ आकाशामध्ये पोहोचते आणि पृथ्वीचे तापमान ६० ते ७० अंशांपर्यंत खाली कोसळू शकते. पृथ्वीवर भुकंप देखील होऊ शकतो.
अंतराळातील काही निरीक्षणे
- नासाच्या स्पेस वॉच प्रकल्पाच्या माध्यमातून धूमकेतू आणि अशनीकडे लक्ष ठेवले जाते आणि उपाययोजना करण्यात येतात.
- २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मायक्रोसंकंदाने कमी झाला आहे.
- दर एक लक्ष वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे सेंटीमिटरने ओढली जाते.
- दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३.८ सेंटिमिटरने लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा मिलीसेकंदाने मोठा होईल.
- पृथ्वीवरील पाच खंड सुद्धा सरकत आहे. न्युयॉर्क शहर लंडनपासून दरवर्षी २.५ सेंटीमिटरने दूर सरकत आहे.

पर्यावरण संतुलन काळाची गरज
-पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पृथ्वीचे थोड्याच दिवसात वाळवंट होईल. यासाठी आतापासूनच उपाय योजना करणे आवश्यक आहे.
विजय गिरूळकर, हौशी खगोल अभ्यासक अमरावती