आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Sport Council, Latest News In Divya Marathi

विद्यापीठात आजपासून जागतिक क्रीडा परिषद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वर्ल्ड रिक्रिएशन एज्युकेशन असोसिएशन (डब्ल्यूआरईए) अन् संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे शुक्रवारी (दि. 21) जागतिक क्रीडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक खेळांसोबतच इतर विषयांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे.
‘डब्ल्यूआरईए’चे अध्यक्ष डॉ. यंग की ली (द. कोरिया) हे प्रमुख पाहुणे असून, तेच या परिषदेत विशेष वक्ते म्हणून बीजभाषण करणार आहेत. याशिवाय उपाध्यक्ष अन् इथिओपियाच्या मेकेले विद्यापीठाच्या क्रीडा विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सौमित्र मोंडल (इथिओपिया) या क्रीडा विज्ञान या विषयावर प्रकाश टाकतील. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके राहतील. या परिषदेला देश-विदेशातील सुमारे 150 तज्ज्ञ आणि स्थानिक शाळांमधील निवडक 75 स्वयंसेवक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती ‘डब्ल्यूआरईए’चे भारतातील अध्यक्ष आणि आयोजन सचिव डॉ. सच्चिदानंद बेहरा यांनी दिली.
‘विश्वातील पारंपरिक खेळ’ या विषयावर 21 मार्च रोजी दुपारी जगभरातील क्रीडा तज्ज्ञ त्यांचे विचार मांडणार आहेत. हेच या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणता येईल. 22 मार्च रोजी समारोप होणार असून, तत्पूर्वी परिषदेचे औचित्य साधून डब्ल्यूआरईएच्या भारतातील कार्यकारिणीची स्थापना होणार आहे.
याशिवाय परिषदेत भारतीय शारीरिक शिक्षण फाउंडेशन, नवी दिल्लीचे सचिव पीयूष जैन; बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी (राजस्थान) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. पिंटू मोडक; मुंबई विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. वासंती कधिरावण; कानपूर येथील डॉ. मनोज कुमार प्रजापती; पुसदच्या पी. एन. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. एल. गजभिये; दिग्रस येथील डॉ. आर. एम. कदम; सोलापूरच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे संचालक प्रो. व्ही. तिरुपती; पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. पी. के. पटेल; मध्य प्रदेशातील अवधेश प्रताप सिंग रेवा विद्यापीठाचे डॉ. एच. एस. अटवाल; मुंबई येथील बीपीसीए शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. जी. के. ढोक्रात; पुणे येथील प्राध्यापक अब्दुल शकुर सय्यद आणि नागपूरच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. के. पी. भगत या परिषदेला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील क्रीडाप्रेमींसाठी ही एक पर्वणी असेल या निमित्ताने खेळांची नवी परिभाषा व ओळख तसेच तज्ज्ञांचे विचार जाणून घेता येईल.