आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worship 'furnished Showroom,latest News In Divya Marathi

‘आराधना’चे सुसज्ज शोरूम अमरावतीकरांसाठी सज्ज, रमण यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- 37 वर्षांपासून ग्राहकांमध्ये स्थान मिळवलेले आराधना शोरूम आता अधिक सुसज्ज वातानुकूलित अशा पंधरा हजार चौरस फूट जागेमध्ये विस्तारित होत आहे. ‘आराधना’च्या जवाहर रोडवरील या शोरूमचे हिंदी स्टार टी.व्ही.वरील ‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेतील इशिता रमण (दिव्यांका त्रिपाठी करण पटेल) यांच्या हस्ते शनिवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे. हबलानी परिवारतर्फे गुरुवारी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती देण्यात आली.

1977 साली सतीधाम मार्केट येथे रोशनलाल हबलानी यांनी आपल्या चार बांधवांसोबत छोट्याशा जागेत लावलेले हे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी जपत प्रतिष्ठानने आपला ठसा उमटवला आहे. नवीन विस्तारित शोरूममध्ये अत्याधुनिक साज-सज्जा, आकर्षक फर्निचर, वातानुकूलित व्यवस्था आहे. लग्न बस्ता हे आराधनाचे वैशिष्ट्य आहे. या शिवाय पार्टिवेअर, फॅन्सी मध्यम रेंजच्या देशातील प्रमुख शहरांतील सुप्रसिद्ध साड्या अत्याधुनिक शोरूममध्ये उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तरुणींसाठी जीन्स, टॉप, कुर्तीज, महिला तरुणींसाठी सलवार, सुट्स, ड्रेस मटेरियल, फ्लोअर लेंग्थ, अम्ब्रेला सूट, कलकत्ता वर्क, एक्सक्लुझिव कुर्तीज, लॅगीन जॅगिंगची श्रुंखला येथे उपलब्ध आहे. तरुणींसाठी सर्व ब्रँडेड कंपनींचे शर्टस्, पॅन्ट्स, टी शर्टस् फॉर्मल सुटिंग शर्टिंग तर, नवरदेवासाठी कोट सूट, शेरवानी, इंडो-वेस्टर्न, पार्टिवेअर येथे उपलब्ध आहे. शुभप्रसंगी लागणारे अहेर, देण्या-घेण्याच्या साड्यांसाठी होलसेल विभागही ग्राहकांसाठी सुरू करण्यात येत आहे. संपूर्ण परिवारासाठी एकाच छताखाली खरेदी करता यावी, यासाठी हबलानी परिवारासह कर्मचारी वर्ग तत्पर आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेला रोशनलाल हबलानी, मनोहरलाल हबलानी, पूरणलाल हबलानी, लक्ष्मणदास हबलानी यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.