आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Y S Mahagande Appoint As Deputy CEO For Amravti Zp

अमरावती झेडपीला मिळणार अॅडिशनल सीईओ ; वाय. एस. महांगडे नवे डेप्युटी सीईओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुमारे सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदासह विविध पदांवर लवकरच पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव वी. गिरीराज आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यात याबाबत शुक्रवारी दूरध्वनीवर चर्चा झाली.
अमरावती जिल्हा परिषदेत सुमारे सात महिन्यांपासून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. "दिव्य मराठी'ने ३१ डिसेंबरच्या अंकात दोनही रिक्त पदांचे वृत्त प्रकाशित केले होते. पूर्णवेळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना अतिरिक्त कामकाज पाहावे लागत होते. प्रशासन विभागातही तशीच परिस्थिती होती.
पूर्णवेळ अधिकारी नसल्याने या पदाचा प्रभारही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद यांच्याकडेच आहे. वारंवार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर कामकाज करावे लागत असल्याने ताण पडत असल्याची बाब भंडारी यांनी प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून दिली.
भंडारी यांनी जिल्हा परिषदेतील कामकाजाबाबत विस्तृत माहिती दिल्यानंतर प्रधान सचिव वी. गिरीराज यांनी तातडीने अमरावती जिल्हा परिषदेला पूर्णवेळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यापुढे महत्त्वाची पदे रिक्त राहणार नाहीत, याबाबत मंत्रालयातील अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

शासनाकडे केली विनंती
^रिक्त पदांबाबत प्रधान सचिवांकडे विनंती केली आहे. नियुक्ती आदेश लवकरच येतील, असे त्यांनी नमूद केले आहे. अनिल भंडारी,सीईओ, जिल्हा परिषद,अमरावती.

४८ तासांत नियुक्ती
अमरावती जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या पदांवर सुमारे ४८ तासांत अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे संकेत आहेत. नियुक्त केलेले अधिकारी तत्काळ रुजू होतील, याबाबतही सूचना देण्यात येणार आहेत.

प्रधान सचिवांशी झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर सायंकाळी आठच्या सुमारास ग्रामविकास विभागाने वाय. एस. महांगडे यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तातडीने नियुक्ती केली. श्री. महांगडे हे रजेवर होते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना शासन आदेशात तातडीने रुजू होण्याबाबत कळवण्यात आल्याचे जिल्हा परिषदेतील सूत्रांनी सांगितले.
महांगडे हे यापूर्वी मुंबई येथे कार्यरत होते. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी आठच्या सुमारास त्यांना अमरावतीच्या सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आल्याचे आदेश मंत्रालयातून निघाले.