आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yavatmal News In Marathi, Child Death In Yavatmal

यवतमाळमध्‍ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. नागपूर मार्गावरील डोर्ली परिसरातील पाझर तलावात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. आशीष शेषराव मनवर (13) रा. अंबिकानगर असे मृत मुलाचे नाव आहे.


आशीष हा त्याच्या मित्रांसोबत गुरुवारी सकाळी महाशिवरात्रीनिमित्त पाचधरा तीर्थस्थळावर जाण्यासाठी घरून निघाला होता. तो त्याच्या मित्रांसोबत पाचधारा येथे न जाता डोर्ली परिसरात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला.तलावातील कपारीत त्याचा पाय रुतल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. या वेळी त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांनाही यश आले नाही. या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी सकाळी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने आशीषचा शोध सुरू करण्यात आला. त्या वेळी आशीषचा मृतदेह तलावातील कपारीत रुतून बसल्याचे आढळले.