आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्ये देशी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - देशी बनावटीचे देशी पिस्तूल बाळगणार्‍या एका युवकाला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई टोळीविरोधी पथकाने मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नेताजी मार्केट परिसरात केली.


अतुल मारोतराव पानसे (वय 31 वर्षे, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी) असे त्या युवकाचे नाव आहे. सध्या शहरात मोठय़ा प्रमाणात पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्यातच एक युवक देशी पिस्तूल घेऊन नेताजी मार्केट परिसरात फिरत असल्याची माहिती टोळीविरोधी पथकाला मिळाली. त्यावरून पथकातील सहायक फौजदार वसंता मडावी, सैयद सातीद, सुनील खंडागळे, बबलू चव्हाण, रुपेश पाली, सुरेंद्र वाकोडे, प्रशांत हेडावू आणि बबलू चंदन यांनी नेताजी मार्केट परिसरात सापळा रचला. त्यात अतुल याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.