आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yavatmal News In Marathi, Farming Dispute Claimed Nice Life

शेताच्या वाद गेला विकोपाला, काकाने काढला पुतण्याचा काटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शेतीचा वाद विकोपाला जावून त्यात काकाने कुर्‍हाडीचे वार करुन पुतण्याचा खून करुन त्याचे प्रेत नाल्यात फेकून दिले. ही घटना दारव्हा तालुक्यातील उजोना येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रमेश गणेश पारीसे वय 30 वष्रे रा. उजोना असे मृतकाचे नाव आहे.


वडिलोपार्जित शेतीच्या हिस्सेवाटणीवरून रमेश आणि त्याचा काका बंडू यांच्यात वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी रमेश घराबाहेर कामानिमित्त पडला तो परत आलाच नाही. त्यामुळे पत्नी जयर्शीने त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता गावातीलच आमझरे कुटुंबातील एका महिलेने तो घेतला. तसेच त्याचा मोबाईल आपल्याकडे राहिला. रमेश कुठे गेला, याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान सकाळी गावालगत नाल्याच्या झुडुपात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रमेशच्या नातेवाइकांनी घटनास्थळ गाठून ओळख पटवली. तसेच ही माहिती लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील यांना दिली. त्यावरून ते पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाच्या पाहणीत रमेशच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. नंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. चौकशी दरम्यान, पोलिसांनी रमेशच्या पत्नीने त्याच्या मोबाईलवर केलेल्या कॉलवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर कॉल घेणार्‍या महिलेसह रमेशचा काका बंडू चंपत पारिसे वय 40 वष्रे, गोलू शंकर आमझरे वय 18 वष्रे रा. उजोना आणि एक 14 वर्षीय बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता तिघांनीही रमेशच्या खुनाची कबुली दिली. रमेशचे वडिल गणेश पारीसे यांच्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कुर्‍हाड जप्त करण्यात आली आहे.