आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीच्या पदभरतीला पेपरफुटीमुळे ग्रहण, भावासाठी विस्तार अधिकाऱ्याने घेतली पेपर फोडण्याची रिस्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - वारंवार पेपर फुटत असल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीला एकप्रकारे ग्रहणच लागले आहे. नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण ताजेच असताना, काल २२ रोजी झालेल्या परिचरपदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला आहे. या प्रकरणात एक विस्तार अधिकारीच अडकला असून, शासकीय सेवेत लहान भाऊ रुजू व्हावा म्हणून त्याने आपली नोकरी डावावर लावून ही 'रिस्क' घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. एकंदरीत या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदावर व्ही. आर. राऊत कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून ते शासकीय सेवेत होते. यापूर्वीसुद्धा विस्तार अधिकारी राऊत बदली प्रकरणात वादग्रस्त ठरले होते. मात्र, त्या वेळी शेवटच्या टप्प्यात सर्व काही शांत पद्धतीने पार पडले, तरीसुद्धा त्यांचा गैरप्रकार सुरूच होता. शेवटी दुसऱ्या प्रकरणात अडकण्याची वेळ त्यांच्यावर येवून ठेपलीच. जिल्हा परिषदेच्या परिचरपदाचा पेपर शनिवारी वाजता होता.
दरम्यान, शहरातील जिल्हा परिषद काटेबाई कन्या शाळेतील वर्ग खोली क्रमांक वर विस्तार अधिकारी व्ही. आर. राऊत यांची पर्यवेक्षक म्हणून ड्युटी लावण्यात आली होती, तर त्यांच्या भावाचा क्रमांक दारव्हारोडवरील एका शाळेत आला होता. ज्या वर्गखोलीत भावाचा क्रमांक होता, त्याठिकाणच्याही पर्यवेक्षकासोबत विस्तार अधिकाऱ्याने सेटिंग करून ठेवल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने एकाजणाच्या माध्यमातून क्लासेसपर्यंत हा पेपर पोहोचवण्यात आला होता. मात्र, क्लासेसचालकाने हे बिंग फोडले आणि थेट पोलिसांशी संपर्क साधून संपूर्ण हकिकत सांगितली. त्यावरून पोलिसांनी विस्तार अधिकारी व्ही. आर. राऊत याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, पेपर बाहेर पाठवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
याप्रकरणी सीईओ शरद कुळकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगावरोड पोलिसांनी विस्तार अधिकारी व्ही. आर. राऊत याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. सध्या पोलिस पेपर नेऊन देणाऱ्या युवकाचा शोध घेत आहे. सोमवारी त्याला न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

कडक कारवाई करू
^पेपरफुटी प्रकरणात संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. असे प्रकार वारंवार घडू नये याकरिता प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतील. शरदकुलकर्णी, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ

कर्मचाऱ्यांमध्ये संताप : परिचरपदासाठीतब्बल अठरा हजारांवर उमेदवारांचा अर्ज आल्यामुळे महिन्याभरापासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी व्यस्त होते. ही परीक्षाच आता रद्द झाल्याने ते संतापले आहेत.
बिंग फुटणार याची कल्पना मिळताच पेपर फोडणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याच्या भावाच्या रूमवरील पर्यवेक्षकाने थेट रूम बदलवून घेतली. याचीही माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला मिळाली आहे. त्यावरून संबंधित कर्मचाऱ्याचेही बयाण नोंदवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधिताला शो कॉज पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन्ही परीक्षा केंद्रांवरील केंद्रप्रमुखांचेही बयाण नोंदवण्यात येणार आहे.
रद्द परीक्षांबाबत संभ्रम कायम
कृषी विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), तारतंत्री आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी रविवार, (दि. १) रोजी पेपर पार पडला. मात्र, हा पेपर औरंगाबाद जिल्ह्यात फुटल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शनिवार, (दि. २२) आयोजित परिचरपदाचा पेपर फुटल्याने जिल्हा परिषदेच्या पदभरतीला गालबोट लागले आहे. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये पदभरती निष्पक्ष पद्धतीने होईल की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.