आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन संघटनांच्या भांडणात चांगला ‘योग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एकाच खेळाच्या दोन संघटना जर आपसात भांडत असतील तर खेळाडू भरडले जाण्याची किंवा त्यांच्या नुकसानाची दाट शक्यता असते. मात्र, दोन संघटनांच्या भांडणात खेळाडूंचे नुकसान होण्याऐवजी त्यांचा फायदाच झाला असून, अमरावतीत जिल्हास्तरीय योग स्पर्धेत संगीताच्या तालावरील ऱ्हीदमिक आर्टिस्टिक योग प्रकारांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.

यंदा जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे तसेच प्रदीप मुगल राजू देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे खेळाडूंच्या फायद्याचा हा योगा‘योग’ साधला आहे. सोबतच बाहेरून तटस्थ राष्ट्रीय दर्जाचे पंचही बोलावण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतही या प्रकारात दर्जेदार कामगिरी करता येईल, अशी आशा योगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
खेळाडूंच्या भल्यासाठी तटस्थ पंचांना पाचारण
खेळाडूंच्याभल्यासाठी तसेच संघटनांमधील वाद टाळण्याच्या उद्देशाने मुद्दामच जिल्‍हास्तरीय योगासन स्पर्धा उशिरा घेतली. यासाठी तटस्थ ज्यांना योगाचे पूर्ण ज्ञान आहे, अशा पंचांना पाचारण करण्यात आले आहे. या वेळी प्रथमच दोन नवे प्रकार जिल्हास्तरावर घेतले जातील; तसेच ही स्पर्धा सर्वांपुढे विभागीय क्रीडा संकुलात घेतली जात आहे. अविनाशपुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी, अमरावती.

राजू देशमुख यांच्या उपोषणाचे फलित
तीनमहिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे योग प्रशिक्षक राजू देशमुख यांनी बेमुदत उपोषण केले होते. स्पर्धांमध्ये पारदर्शक निर्णय दिले जावेत, पंच तटस्थ असावेत, ऱ्हीदमिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सचा जिल्हा, विभागीय राज्य स्पर्धेत समावेश व्हावा, एकाचवेळी राज्य राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जाऊ नयेत, या त्यांच्या मागण्या होत्या. यासंदर्भात त्यांनी बृहन्महाराष्ट्र योग परिषदेिवरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी बृन्महाराष्ट्र योग परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना िदल्या होत्या. त्यामुळेच या वेळी तटस्थ सुधारित पद्धतीने स्पर्धा घेतली जात आहे.