आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yoga News In Marathi, Divya Marathi, India, Africa, Amravati

आता योगगंगेचा प्रसार होणार आफ्रिकेतही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - भारतीय व्यायाम पद्धती म्हणून ज्या योगासनांकडे बघितले जाते, त्याचा प्रसार आता आशियासोबतच अमेरिका, युरोपच नव्हे, तर आफ्रिकेतही होत आहे. यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रयत्न फळाला आलेत.
पोलंड व सेशेल्स येथील काही संस्थांचे प्रतिनिधी हे नुकतेच अमरावतीत मंडळात येऊन योगासने शिकून गेले. यात सध्या सेशेल्स येथे वास्तव्यास असलेल्या फ्रान्सच्या एका महिला प्रशिक्षकाचाही समावेश होता. सेशेल्सने पुन्हा काही तज्ज्ञांना आपल्या देशात आमंत्रित केले आहे. मंडळातील प्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. अरुण खोडस्कर आणि डॉ. सूर्यकांत पाटील यांनी देश-विदेशात योगगंगा पोहचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. र्शीलंका, जपान, डेन्मार्क, सेशेल्स, मॉरिशस, मलेशिया आणि र्जमनी येथे योग प्रात्याक्षिके सादर करून योगाचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रयत्न त्यांनी चालवले आहेत.


महाराष्ट्र मंडळांचे आमंत्रण

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील योगतज्ज्ञांना सेशेल्स, झिम्बॉब्वे, नैरोबी, केनिया या आफ्रिकी देशांमधील महाराष्ट्र मंडळांनी आमंत्रण दिले आहे. मूळ भारतीयांची योगसाधना बघून स्थानिक लोकांमध्येही आता शरीर वज्रासारखे मजबूत बनवणार्‍या योगांचे आकर्षण निर्माण झाले. भविष्यात योगा शिकण्यासाठी येथे विदेशी लोक येण्याची शक्यता आहे.


1936 पासून परंपरा
एचव्हीपीएममध्ये योगाचे धडे देण्याची परंपरा ही 1936 पासून सुरू आहे. येथून मोठय़ा प्रमाणावर विदेशात योगसाधनेचा प्रचार व प्रसार झाला. प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या पुढाकाराने विदेशात योगवर्गांचे आयोजनासाठी यशस्वी प्रयत्न झालेत. भारतीय व्यायामपद्धती विदेशी नागरिक, क्रीडा संस्थाच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या मनात रुजली.


झिम्बॉब्वे, केनिया, नैरोबीतही योगासनांविषयी उत्सुकता
बहुतांश आफ्रिकी देशांमध्ये मध्यम पल्ल्याचे अन् लांब अंतराचे धावक निर्माण होत असतात. त्यांना लांब अंतर धावण्यासाठी स्टॅमिना डेव्हलप करावा लागतो तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कायम पहिल्या स्थानावर राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. यामुळे साहजिकच त्यांच्या मनावर ताण निर्माण होतो. तो घालवण्यासाठी योगासने ही प्रभावी व्यायाम पद्धती आहे. आधी एरोबिक्सचा आधार घेतला जायचा. मात्र, आता फुफ्फुस मजबूत करण्यासोबतच दमखम वाढवण्यासाठी योगसाधना ही परिणामकारक ठरू शकते, यावर बरेच संशोधन झाल्यामुळे तेही योग शिकण्यासाठी उत्सुक आहेत