आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ योगासन स्पर्धा डीसीपीई, बी.एस.पाटील कॉलेज ठरले अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे १५ ते १७ जानेवारी या कालावधीत विद्याभारती महाविद्यालयात घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन योगासन स्पर्धेत एचव्हीपीएमद्वारे संचालित डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशनने (डीसीपीई) उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या आधारे ४२९.८९ गुणांची कमाई करून मुलांच्या गटात अन् परतवाड्याच्या बी. एस. पाटील महाविद्यालयाने मुलींच्या गटात ३९२.६५ गुणांची कमाई करून अजिंक्यपद पटकावले.

विजेत्या मुलांच्या संघातर्फे आर. सूरज, रणजित देशमुख, किसन देशमुख, मनीष साहा, विजय गांजरे आणि विकास मदने यांनी दर्जेदार कामगिरी केली.

मुलांच्या विभागात अचलपूरच्या सी. एम. कढी महाविद्यालयाला ३९५.२७ गुणांसह उपविजेतेपदावर आणि मुलींच्या विभागात अंजनगावसुर्जीच्या राधाबाई सारडा महाविद्यालयाला ३८७.८९ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत मुलांच्या चार मुलींच्या सहा संघांनी भाग घेतला. स्पर्धेत तज्ज्ञ योग शिक्षकांपुढे ७६ योगपटूंनी योग आणि शुद्धिक्रिया सादर केल्या. यात ३२ मुले ४४ मुलींचा समावेश होता. दोन्ही गटांसाठी चार आवश्यक आसनांसोबतच १२ स्ट्रोकचा सूर्यनमस्कार अत्यावश्यक होता. याशिवाय त्यांना तीन आसनं त्यांच्या आवडीनुसार करायची होती. मुले मुलींच्या विभागासाठी वेगवेगळ्या शुद्धिक्रियाही होत्या. डॉ. राजपूत डॉ. एस. पाटील या तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदशनात ही स्पर्धा झाली.

आंतरमहाविद्यालयीन योगासन स्पर्धेत शुद्धिक्रिया प्रकारात स्पर्धकांनी योगाचे विविध प्रकार प्रस्तुत केले. छाया: मनीष जगताप

मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक
नुकत्याचआटोपलेल्या विद्यापीठ योगासन स्पर्धेत मुलींच्या सहा अन् मुलांच्या चार संघांनी भाग घेतला.सतात. सहा मुलींच्या संघात ४४ अन् चार मुलांच्या संघात ३२ खेळाडूंचा समावेश होता. यात मुलांमध्ये डीसीपीईच्या सहा योगपटूंनी देखणी अचूक आसनं सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांनी स्पर्धकांचे कौतूक करून प्रोत्साहन वाढवले.

दोन्ही गटांसाठी आवश्यक आसनं : १.पश्चिमोत्तानासन, २.सर्वांगासन, ३. धनुरासन, ४. कर्णपीडासन.
अत्यावश्यक: १२काउंटचा सूर्यनमस्कार.

ऐच्छिकआसनं मुले : १.मयूरासन, २. वृक्कासन, ३. पद्मबकासन, ४. पूर्णशलभासन, ५. हनुमानासन (यांपैकी कोणतेही तीन).

ऐच्छिकआसनं मुली : १.राजकपोतासन, २.नटराजासन, ३. विभक्त पश्चिमोत्तानासन, ४. पूर्ण धनुरासन, ५. वातायनासन (यांपैकी कोणतेही तीन).

शुद्धिक्रियादोन्ही गटांसाठी आवश्यक : जलकपालभाती.यात तोंडाने पाणी पिऊन नाकातून बाहेर काढावे लागते.
मुलींसाठीऐच्छिक शुद्धिक्रिया : १.सूत्र नीती. बारीक रबरी कॅथेड्रल नाकातून घालून तोंडातून बाहेर काढावी लागते.
२. जलनीती. यात लांब तोटीच्या चंचूपात्राने एका नाकपुडीतील पाणी दुसरीतून बाहेर काढावे लागते.

मुलांंसाठीऐच्छिक शुद्धिक्रिया : १.नौली. यात पोटाचे स्नायू गोल फिरवावे लागतात. २. वस्त्रधौती यात से.मी. रुंद मी. पातळ सूती कापड पाण्याने ओले करून गिळायचे बाहेर काढायचे.

इतिहासात प्रथमच इन-कॅमेरा चाचणी
१५१६ जानेवारी रोजी झालेल्या योगासन स्पर्धेच्या माध्यमातून मुली मुलांचा असे प्रत्येकी १५ योगटपटूंचे दोन संघ निवडण्यात आले. त्यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच इन-कॅमेरा निवड चाचणी घेण्यात आली.