आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Woman Refrain From Suicide Issue At Amravti

‘त्या’ युवतीला वर्षभराने मिळाली जगण्याची आशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पदव्युत्तरपदवी घेतलेल्या मुलीची (अनिता काल्पनिक नाव) सासरच्यांकडून फसगत झाल्यामुळे नैराश्यातून मनोधैर्य ढासळून तिच्‍या मनाचा कल आत्महत्येकडे झुकला. मात्र, एचव्हीपीएम हेल्पलाइनने तिला आत्महत्येपासून परावृत्त करून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. या युवतीने फसगत करणाऱ्या पतीसोबत राहणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तिला घटस्फोट मिळवून देण्यासाठीही हेल्पलाइनने मदत केली.
पूर्वीच्या कटू आठवणी मागे टाकून आता तिला सामान्य आयुष्य जगायचे असून, ती स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. या युवतीचा ितवसा तालुक्यातील शेतकरी कुटुंबात पदवीधर किशोर (काल्पनिक नाव) सोबत वर्षभरापूर्वी विवाह झाला. विवाहापूर्वी वरपक्षाने मुलगा कायमस्वरूपी नोकरीवर असल्याचे सांगितले. मात्र, लग्नानंतर हा मुलगा खासगी कंपनीत अस्थायी नोकरीवर असल्याचे स्पष्ट आले. त्यामुळे नववधू तिच्‍या कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. काही दिवसांनी मुलाने नोकरी सोडून घरातच ठाण मांडले. परिणामी, किशोर अनिता यांच्या संसारातील आनंद हरपला तणावाने शिरकाव केला. अनिताचे मनोधैर्य खचले. घरातील अशांतता दोन्ही कुटुंबांतील संघर्षामुळे अनिताच्या मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागला.
दोन्हीकडील वडीलधारी मंडळी नातेवाइकांनी मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. अशा परिस्थितीत एका अनोळखी व्यक्तीने मुलीच्या वडीलांना एचव्हीपीएम हेल्पलाइनचा आधार घेण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेतली. हेल्पलाइन सदस्यांनी दोन्ही कुटुंबीयांना सामोपचाराने घेण्यास सांगितले. मात्र, कुणीही माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे हेल्पलाइन सदस्यांनी सर्वप्रथम अनिताला आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले आणि अनिता आता नव्याने जीवनझेप घेण्यास सज्ज झाली आहे.
सामोपचाराने सोडवला प्रश्न
हेल्पलाइननेप्रथम मुलगा मुलीकडील मंडळींना बोलावून समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. परंतु, दोन्ही पक्ष आपापल्या मतावर ठाम होते. यातून मार्ग निघत नसल्याचे बघून अखेर एचव्हीपीएम प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्रा. संजय तीरथकर, प्रा. रवींद्र खांडेकर, राजेश चांडोळे, प्रशांत चौधरी आणि दीपक देशमुख यांनी पुढील वाद टाळण्यासाठी उभयतांपुढे सोडचिठ्ठी घेण्याचा प्रस्ताव ठेवला, तो त्यांनी मान्य केला. दोन्ही पक्षांकडील मंडळींच्या सहमतीने आपसी करारनामा करून घटस्फोटाचे काम आटोपले. त्यामुळे मुलगा मुलगी आपापल्या मर्जीनुसार जगण्यास मोकळे असून, यानंतर दोघांनीही नवीन आयुष्यास प्रारंभ केला आहे.

पाच हजार प्रकरणे काढली निकालात
एचव्हीपीएमहेल्पलाइनने २००७ पासून सामाजिक कर्तव्य निभावत कौटुंबिक वाद, आर्थिक फसवणूक, छेडखानी, मुलींची फसवणूक, मोबाइलवरील अश्लील एससएमएस अशा स्वरूपाची पाच हजार प्रकरणे निकालात काढली आहेत. मुली महिलांना न्याय मिळवून देण्यात पोलिस, विभागचेही हेल्पलाइनला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.