आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड घालून धाकट्याने केला थोरल्याचा खून, वादानंतर घडली घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राजापेठ ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या मायानगर भागात सोमवारी धाकट्या भावाने थोरल्याचा डोक्यात दगडी पाटा घालून खून केला. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.सुरेश शंकरराव मेहरे (32, रा. मायानगर, अमरावती, ह. मु. पुणे) असे मृतकाचे, तर नीलेश शंकरराव मेहरे (30, रा. मायानगर) असे आरोपीचे नाव आहे. सुरेश हे मागील अनेक वर्षांपासून पुण्याला राहतात. त्यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय होता. नीलेशसुद्धा शहरात सेंट्रिंगचाच व्यवसाय करतो.

गेल्या एक महिन्यापासून सुरेश अमरावतीला आले होते. नीलेशच्याच घरी ते थांबले होते. सोमवारी नीलेश आणि त्याची पत्नी सायंकाळी सिनेमा पाहायला गेले होते. घरी परतल्यावर सुरेशने घराचे कुलूप तोडून साह्त्यिाची फेकफाक केल्याचे त्यांना आढळले. यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. यातूनच नीलेशने सुरेशच्या डोक्यावर दगडी पाटा मारला. यात सुरेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राजापेठ ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले.