आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींचा पुतळ स्वच्छतेसाठी सरसावले ‘मैत्री’चे तरुण हात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरातील कमालीच्या अस्वच्छतेकडे लक्ष वेधल्यानंतर रविवारी सकाळी ‘मैत्री’चे हात पुढे सरसावले आणि तासभरात परिसर स्वच्छ झाला. परिसराचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी तरुणाईचे हात सक्षम असल्याचेच यातून सिद्ध झाले. मैत्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यापुढेही विधायक कार्यासाठी योगदान देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.

जयस्तंभ चौकात महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा आहे. आजूबाजूला लोखंडी कठडे उभारून हिरवळसुद्धा तयार करण्यात आली आहे. अनेकदा महापालिकेकडून साफसफाईसुद्धा केली जाते. मात्र, पुतळा परिसराच्या मागच्या बाजूला प्रचंड अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य असल्याचे वास्तव प्रकाशित झाले होते. त्याउपरही महापालिका यंत्रणेने स्वच्छता करण्याचे सौजन्य दाखवले नव्हते. अखेर रविवारी सकाळी मैत्री संघटनेचे अविनाश भाकरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवळपास दीड तास र्शमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. या वेळी कुलदीप फसाटे, अनुप पांडे, आकाश हिवसे, निखिल गाले, हृषिकेश तायडे, निखिल लुंगे, ऋतुराज राऊत, अक्षय काळे, रोहित सरय्या, अनिकेत कायदे, अमित गांजरे, प्रणय मेहरे, हृषिकेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.