आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट कोसळून युवक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(याच इमारतीतील लिफ्ट काेसळून युवकाचा जागीच मृत्यू झाला. छाया: मनीष जगताप )
अमरावती- लिफ्टचीदुरुस्ती करत असताना तार तुटून लिफ्ट अंगावर पडून एका २३ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मांगीलाल प्लॉट येथील जय गजानन रेसिडेन्सी या रहिवासी इमारतीत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. शंकर पांडुरंग मोहर्ले, असे मृतक युवकाचे नाव असून, तो वर्धा जिल्ह्यातील खडांगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुसंद गावचा रहिवासी होता. या घटनेची माहिती मृतक शंकरचा भाऊ मंगेशने गाडगेनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
मृतक शंकर त्याचा भाऊ हे लिफ्ट दुरुस्तीचे काम करतात. नागपूर येथील ठेकेदार इम्रान शेख यांच्याकडे ते लिफ्ट दुरुस्तीसाठी काम करीत होते. जय गजानन रेसिडेन्सी येथील लिफ्ट बंद पडल्याने त्यांनी अमरावती येथील ठेकेदार मनेश्वर रेहपाटे यांच्याकडून हे काम घेतले होते. लिफ्टचे काम करण्यासाठी ते वर्धेहून अमरावती येथे राहत होते. दरम्यान, शुक्रवारी लिफ्टचे काम करताना दुपारी साडेबारा वाजता अचानक तार तुटल्याने ही लिफ्ट खाली कोसळून शंकरच्या अंगावर पडली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडली त्या वेळी शंकरचा भाऊ मंगेश हा तेथेच हजर होता. त्याने आरडाआेरड केल्यानंतर संपूर्ण रहिवासी त्या ठिकाणी जमले. घटनेची माहिती लगेचच गाडगेनगर पोलिस ठाण्यात देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तुटलेलीतार घेतली ताब्यात

जीतार तुटून शंकरचा मृत्यू झाला ती तार पोलिसांनी पंचनाम्यासाठी ताब्यात घेतली आहे. दिल्ली येथील ईसीई इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या नावाची ही लिफ्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही तार निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती पुढे आली आहे. या तारेला वरून केवळ कोटिंग असून, आतमध्ये नायलॉनचा वापर केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तारेचा दर्जा निकृष्ट आहे किंवा नाही, हे तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तर मोठा अनर्थ घडला असता
जयगजानन रेसिडेन्सी हे रहिवासी अपार्टमेंट आहे. याठिकाणी एकूण चार माळे असून, १६ कुटुंब राहतात. गेल्या काही दिवसांपासून येथील लिफ्ट बंद होती. शुक्रवारी चौथ्या माळ्यावर लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू असताना ही घटना घडली. अपार्टमेंटमधील नागरिकांना घेऊन जाताना ही घटना घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा या वेळी परिसरात होती.
तार तुटल्याने झाला मृत्यू
लिफ्टचातार तुटल्याने ते लिफ्ट अंगावर पडून शंकरचा मृत्यू झाला. लिफ्टचा तार कधी तुटत नाही. परंतु, आज हे कसे झाले याची कल्पना नाही. मागील तीन वर्षांपासून शंकर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करीत आहे. मला या कामाचा वर्ष ते दीड वर्षाचा अनुभव आहे. दोघा भावांनी आम्ही हे काम घेतले होते. मंगेशमोहर्ले, मृतक शंकरचा भाऊ.

अग्निशमन दलाने काढला मृतदेह
मनपाच्याअग्निशमक विभागाने बरीच मेहनत करून युवकाचा मृतदेह बाहेर काढला. ही लिफ्ट शंकरच्या अंगावर पडल्याने तो लिफ्टखाली दबला होता. त्यामुळे अग्निशमनचा एक कर्मचारी खाली उतरून त्याने मृतदेह काढण्यास मदत केली. दुपारी दीडपासून प्रयत्न सुरू केले. तासभराच्या प्रयत्नाअंती शंकरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अग्निशामन अधीक्षक भरतसिंह चौहान यांच्यासह अग्निशमन चमूतील फयाज खा, अजय पंद्रे, मनोहर अंबाडकर, हेमराज भगत, विशाल पिंपळे, दिलीप चौखंडे, सुनील काकडे, दिनेश पुंडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अिग्नशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून लिफ्टखाली दबलेला युवकाचा मृतदेह अखेर बाहेर काढला.