आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टू इन वन’ बॅगची आहे तरुणींमध्ये क्रेझ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - स्टायलिश,ब्रँडेड हँडबॅग्ज हे फॅशनच्या प्रवाहात ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनले आहे. अशी एक तरी बॅग आपल्याजवळ असावी, असे प्रत्येक तरुणीला वाटते.

अशा बॅग्ज या तरुणी महिलांसाठी स्वत:ला ‘प्रेझेंट’ करण्याचे महत्त्वाचे साधन वाटते. मात्र, अशी स्टायलिश हँडबॅग ‘कॅरी’ करणे वाटते, तितके सोपे नाही. कारण अशा बॅग्जचा कलर, डिझाइन, आकारच महत्त्वाचा ठरत नाही, तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे मटेरिअल वापरले जाते, हेदेखील अशा बॅग्ज खरेदी करताना पाहणे महत्त्वाचे ठरते. या बॅग्जची किंमत ३०० रुपयांपासून पुढे असल्याचे बॅग पॅलेसच्या संचालकांनी सांगितले. शहरामध्ये मुंबई दिल्ली येथून विविध बॅग्ज मागवले जातात.

मागणीनुसार करावा लागतो पुरवठा
-नवीनस्टायलिश बॅग व्यक्तिमत्वाला वेगळा आयाम देते. याकडे महिला तरुणी विशेष लक्ष देतात. वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगांच्या हँडबॅग्ज ‘कॅरी’ करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करावा लागतो. कमलबुधवानी, व्यावसाियक.


सॅक हँड बॅग म्हणूनही वापर
सध्या‘टू इन वन’ बॅगची तरुणींमध्ये क्रेझ आहे. याचा वापर सॅक तसेच हँड बॅग म्हणूनही करता येत असल्याने एका किमतीत दोन फॅशन्स सांभाळता येत असल्याचे मत काही तरुणींनी व्यक्त केले.

स्वच्छ केलेली बॅग जास्त चांगला लूक देते. तिच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अधूनमधून तिला धुणे शक्य असेल, तर धुऊन घ्यावे. त्यामुळे ती पुन्हा नवी दिसू लागले. बॅगच्या तळाकडेही लक्ष असू द्यावे. बॅग खरेदी करताना तिच्या बेल्टकडेही लक्ष द्यावेे. त्यामुळे हँडबॅग ‘कॅरी’ करताना अडचण येत नाही.