आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा तंत्रज्ञांनी बनवली ‘गो कार्ट रेसिंग कार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रा.राम मेघे तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या १७ युवा अभियंत्यांनी वर्षभर मेहनत घेऊन ‘गो कार्ट रेसिंग कार’ तयार केली आहे. बुधवारी (दि. २१) महाविद्यालयाच्या प्रांगणात या वाहनाचे पूजन झाले. अखिल भारतीय गो कार्ट रेसिंग चॅम्पियनशिपसाठी भोपाळ येथे ही कार रवाना झाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन गो कार्टविषयी तांत्रिक माहिती दिली. वाहनाचे पूजन करून विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांदे यांनी केले.

अशी आहे कार
*118 सीसी क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वाहनात वापर
*80 किलो आहे वजन
*50 किलोमिटर प्रतितास वेग
*17 युवा अभियंत्यांनी तयार केले वाहन
*16 किलोमीटर धावते प्रती लिटर पेट्रोलमध्ये
*1 वर्ष घेतली अभियंत्यांनी मेहनत