आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Slaps Ex president Pratibha Patil's Son Case Amravati

गजेंद्र उंबरकरला आज न्यायालयात हजर करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आमदार रावसाहेब शेखावतांना थप्पड लगावणारा गजेंद्र उंबरकर दहा दिवसानंतरही कारागृहात आहे. सुरुवातीला सुरक्षेच्या कारणावरून गजेंद्रचा जामीन नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्याची पुन्हा कोठडी मागण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला होता. या सर्व प्रक्रियेमुळे गजेंद्रला मागील दहा दिवसांपासून कारागृहातच राहावे लागले.

गजेंद्रने 29 ऑगस्टला दहीहंडीच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार रावसाहेब शेखावत यांना थापड लगावली. या प्रकरणात प्राथमिक चौकशीअंती ठाणेदार धोत्रे यांची नियंत्रण कक्षात, कोतवालीच्या दोन खुफिया कर्मचार्‍यांची मुख्यालयात बदली झाली, तर आमदार शेखावतांच्या अगंरक्षकाला पोलिस आयुक्तांनी निलंबित केले. हे प्रकरण मुख्यमंत्र्याच्या कानावर घालण्यासाठी काँग्रेसचे महापालिकेतील सर्व नगरसेवक जाणार आहेत व आयुक्तांच्या बदलीची मागणी करणार आहेत. सर्वसामान्य आरोपीची अशा गुन्ह्यात सहजपणे जामीन होतो. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव गजेंद्रला दहा दिवसांपासून कारागृहाच राहावे लागले आहे.