आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Started Black Profile Movement On Facebook

युवकांचे फेसबूकवर ‘ब्लॅक प्रोफाइल मुव्हमेंट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी पाच महिने पूर्ण होऊनही पोलिस तपासाला गती नाही, असा आक्षेप नोंदवत तरुणांनी ‘ब्लॅक प्रोफाइल मुव्हमेंट’ या फेसबूकवरील आंदोलनात सहभागी होऊन ‘दाभोलकरांचे खुनी कोण ?’ हा प्रश्न सरकारला विचारला. दरम्यान, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. तत्पूर्वी दिवसभर अनेक यूझर्सची प्रोफाइल कव्हर काळ्य़ा रंगाची पाहायला मिळाली. राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय महामंत्री अश्विनी सातव-डोके यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाविषयी माहिती दिली होती.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध करत दाभोलकरांचा खुनी अजून का सापडला नाही, याचा जाब शासनाला विचारला होता. युवक मोठय़ा प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक व विविध क्षेत्रांतील यूझर्सचा समावेश होता. अनेक प्रश्न उपस्थित करत गृहविभागावर विविध आरोप या आंदोलनाने केले आहेत. अंधर्शद्घा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणारे डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाली. या घटनेला सोमवारी पाच महिने पूर्ण झाली असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.