आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपी निवडणुकीचा ‘घोळात घोळ’, विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर अध्यक्षांची बैठक रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्हा परिषदेतील विषय समिती सदस्यांच्या निवडीचा तिढा सुटेनासा झाला आहे. विभागीय आयुक्तांनी निवडणुकीबाबत बजावलेल्या पत्रानंतर सोमवारी बोलावण्यात आलेली विशेष सभा अध्यक्ष सतीश उईके यांनी रद्द केली. त्यामुळे सदस्यांच्या निवडणूक प्रक्रियेबाबत ‘घोळात घोळ’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

झेडपीत दहा विषय समिती आहेत. यावर सदस्य म्हणून झेडपी सदस्य पंचायत समित्यांच्या सभापतींची नेमणूक होते. झेडपीत सत्तेवर असलेल्या काँग्रेसने माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, मनोहर सुने यांच्या गटाला दूर ठेवण्यासाठी काही विषय समित्यांवर सदस्यांची नेमणूकच केली नाही. त्यामुळे सदस्य निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेण्यात आला. झेडपी अधिनियम १९६१ नुसार प्रत्येक सदस्य पं.स. सभापती केवळ एकाच समितीत सदस्य राहू शकतो.
अर्जकर्ता ढेपेच अनुपस्थित

निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याची तक्रार जि. प. सदस्य अभिजित ढेपे यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र, ढेपे माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे आजच्या सभेला अनुपस्थित होते. याबद्दल सभागृहात चर्चा होती.

कोठे-किती रिक्त सदस्य?

स्थायी समिती : ०१महिला
जल व्यवस्थापन : ०१महिला
कृषीसमिती : ०४सर्वसाधारण
समाजकल्याण : ०४नामाप्र
शिक्षण: ०३सर्वसाधारण
पशुसंवर्धन: ०४सर्वसाधारण
समिती अन् सदस्य संख्या
- निर्वाचित सदस्य : ५९
- पं. स. सभापती : १४
- एकूण सभासद : ७३
- एकूण समिती : १०
- समितीवर पात्र : ६७
- एकूण समिती सदस्य : ८३
- सध्या रिक्त सदस्य : १७

नियमांनुसार कार्यवाही

^आयुक्तांच्या पत्राच्या आधारे आजची निवडणूक नियमात बसत नव्हती. त्यामुळे सभा रद्द केली. सतीशउईके, अध्यक्ष जिल्हा परिषद.

पैसे वसूल करा

^निवडणूक नियमांत नाही, हे अधिकाऱ्यांनी सांगायला हवे होते. हा खर्च त्यांच्याकडून वसूल करा. सुधीरसूर्यवंशी, शिवसेना

आधीच कळायला हवे

^अध्यक्षांनी सामंजस्य दाखवायला हवे होते. राजकीय अहंकार बाजूला ठेवून सदस्यांना न्याय द्यावा. मनाेहरसुने, भाजपा
कोर्टात जाणार
^सभापती बदलले, की समिती सदस्यही नव्याने निवडले जावे. यासाठी उच्च न्यायालयात जाणार. महेंद्रसिंगगहेरवाल, जि. प. सदस्य