आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • तेरावर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे हताश पालकांनी घेतले विष

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरावर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे हताश पालकांनी घेतले विष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - तेरावर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे हताश झालेल्या आईवडिलांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आईची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला (रेंगेपार) येथे घडली.

अमरदीप खेमराज बहेकार (१३) हा १८ मे रोजी कोदामेडी गावाजवळील घोगराघाट येथे आंघोळीला गेला होता. नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे त्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच बहेकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. खेमराज यांना दोन पत्नी आहेत. मोठी पत्नी धनवंता (३०) व लहान पत्नी प्रमिला (२६) या एकत्र नांदत होत्या. खेमराजची मोठी पत्नी व दोन मुले हे सडक अर्जुनी येथे राहतात, तर खेमराज व
लहान पत्नी प्रमिलासोबत रेंगेपार नवाटोला या गावी राहत होते.

प्रमिलाला मूलबाळ झाले नाही. मोठ्या पत्नीचा मुलगा अमरदीप याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने लहान पत्नी व वडील खेमराजच्या मनावर परिणाम झाला. या दु:खातून ते सावरू शकले नाही. अखेर २० मे रोजी दोघांनीही विष प्राशन केले. गावकर्‍यांना ही माहिती समजताच त्यांनी दोघांना गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान खेमराजचा मृत्यू झाला, तर प्रमिला मृत्यूशी झूंज देत आहे.
बातम्या आणखी आहेत...