आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 CRPF Jawans Killed In Suspected Naxal Attack In Gadchiroli

गडचिरोलीत मतदान पथकावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया गुरुवारी शांततेत पार पडल्यानंतर मतपेट्या मुख्यालयात आणत असताना गडचिरोली जिल्ह्यातील रेपनपल्लीजवळील जंगलात मतदान पथकावर नक्षल्यांनी शुक्रवारी अंदाधुंद गोळीबार केला. यात एक जवान शहीद झाला असून पाच जण जखमी झाले.

गुरुवारी विदर्भात 10 जागांसाठी मतदान पार पडले. गडचिरोली जिल्ह्याच्या नागरिकांनी मतदान करू नये, असे आवाहन नक्षल्यांनी केले होते. नक्षल्यांच्या विरोधाला भीक न घालता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

यादरम्यान गुरुवारी संध्याकाळी एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी एकदा मतदान पथकावर गोळीबार केला होता. दरम्यान शहीद शिपाई गिरीधर अत्राम यांना 20 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तर जखमींना 5 लाखांची मदत
नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या गिरीधर आत्राम यांना पोलिस विभागाच्या मदतीव्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 20 लाख आणि जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.