आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 Thousand 100 Crores Irrigation Work Suspended Irrigation Minister Girish Mahajan

राज्यातील अकराशे कोटींच्या सिंचन कामांना स्थगिती - जलसंपदामंत्री गिरीश महाजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आघाडी सरकारने मंजूर केलेल्या राज्यातील सुमारे अकराशे कोटींच्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिली. महाजन म्हणाले, आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या कालखंडात अनेक सिंचन प्रकल्पांना घाईघाईने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तत्कालीन सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पांबाबत चौकशी करून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सध्या ज्या प्रकल्पांचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे, अशा प्रकल्पांना पूर्ण करण्याकडे सरकारचा कल राहील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.