आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरात सलग ११५ तास कुराण पठणाचा विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुरातील मोहंमद शहजाद परवेज यांनी सतत ११५ तास कुराण पठण केले. शनिवार ३१ जानेवारी रोजी ४.३० वाजता टेका नाका परिसरातील आशीनगरच्या एनआयटी सभागृहात कुराण पठणास प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५० वाजता त्यांचा विक्रम पूर्ण झाला. या विक्रमाचा दावा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे करण्यात येणार असल्याचे या उपक्रमाचे संयोजक मनीष पाटील यांनी सांगितले.

शर्मांचा विक्रम मोडला
सतत पठणाचा विक्रम यापूर्वी काठमांडूच्या दीपक शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी ११३ तास १५ मिनिटे वाचन केले होते.

पहिलाच विक्रम
काठमांडूच्या शर्मांनी कुराण बरोबरच विविध पुस्तके वाचली होती. मात्र, सतत कुराण पठणाचा हा जगातील पहिलाच उपक्रम आहे. परवेज यांनी दीड वर्ष सराव केला होता.