आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेबारा कोटींची यादी ‘फायनल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेतील साडेबारा कोटी रुपयांच्या विकासकामांची यादी दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी अंतिम झाली. गटनेत्यांकडून अंतमि करण्यात आलेली यादी बुधवारी (२० ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करावी लागणार आहे.

यादीला अंतिम स्वरूप देण्यासाठी मंगळवारी दिवसभर मंथन झाले. पालिकेत स्थानिक संस्था कर (एलबीटी) सुरू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून तूट म्हणून २५ कोटी रुपये देण्यात आले. २५ कोटींतील १२.५० कोटी अमरावती विधानसभा, तर १२.५० कोटी रुपये बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी खर्च केले जावे, असा मतप्रवाह निर्माण झाला. आमदार रवि राणा यांच्याकडून बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी १२.५० कोटी रुपये मागण्यात आल्यानंतर याबाबत पालिकेत वादंग झाला. आमदार राणा व खोडके गट आमने-सामने ठाकले. त्यांच्यातील वादामुळे १२.५० कोटी रुपयांचा निधी दीड ते दोन वर्षे पडून राहिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्राचा आधार घेत राणा यांनी साडेबारा कोटी रुपयांची यादी मंजूर करून आणली. मात्र, अविनाश मार्डीकर यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने हा विषय शेवटी आमसभेत चर्चेसाठी आला. २० ऑगस्टपर्यंत यादी अंतमि करीत उच्च न्यायालयात सादर करण्याचा निर्णय या प्रकरणात देण्यात आला. त्यामुळे १३ ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेत प्रशासकीय विषय सादर करण्यात आला. आमदार राणा यांच्याकडून सादर करण्यात आलेली यादी आमसभेत फेटाळण्यात आली, तर बुधवारी उच्च न्यायालयात गट नेत्यांकडून तयार करण्यात आलेली यादी उच्च न्यायालयासमोर सादर केली जाणार आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात २० ते ३० लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. आमसभेत निश्चित करण्यात आल्याप्रमाणे सर्वच गटनेत्यांनी संबंधित नगरसेवकांकडून विकासकामांची यादी मागितली. सर्वांना समान निधी मिळावा म्हणून त्याबाबत सूत्रदेखील तयार करण्यात आले.
असा आहे फॉर्म्युला
बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण कामांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून निधी वाटण्याबाबत सूत्र निश्चित करण्यात आले आहे. गडगडेश्वर असलेल्या दोन कोटी तर १.२५ कोटी रुपये नवाथे अंडरपासवर खर्च केले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित निधी सर्वच प्रभागांत समसमान म्हणजेच २० ते ३० रुपये प्रती नगरसेवक दलिा जाणार आहे.
विरोध करणारे सोबत
लोकसभा नविडणुकीपूर्वी उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे हे खोडके गटाच्या बाजूने होते. मात्र, लोकसभा नविडणुकीतील सत्ता समीकरणानंतर वऱ्हाडे हे आमदार राणा यांच्या गटाकडे गेले. पूर्वी विकासकामांच्या वादातून आमदार राणा व उपमहापौर वऱ्हाडे यांच्यादरम्यान चांगलाच वाद झाला होता. मात्र, आता विरोध करणारे सोबत आल्याचे चित्र आहे.