आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या तोंडावर वर्ध्यात ठक्कर कुरिअरमधून 23 लाख रुपये जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - वर्ध्याच्या महोदय कॉम्प्लेक्समधील ठक्कर कुरिअरमधून 23 लाख 83 हजार रुपये जप्त करण्यात आले. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. कुरिअरचा संचालक शैलेश सौजानी रकमेविषयी काहीच सांगू शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी बॅगेतील रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या स्वाधीन केली. दरम्यान, गुरुवारी अमरावतीत वाहन तपासणीदरम्यान एका कारमधून बेनामी 75 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्याचाही तपास अद्याप लागलेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर हा पैसा आल्याचा संशय आहे.