आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंदियात नाव बुडून 25 जणांना जलसमाधी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गोंदिया जिल्ह्यातील घाटकुरोडा (ता. तिरोडा) गावाजवळ वैनगंगा नदीत बोट उलटून किमान 25 गावकरी बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह सायंकाळपर्यंत बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, बेपत्ता गावक-यांची संख्या मोठी असून त्यांचा प्रशासन व गावक-यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध सुरू आहे. बुधवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
तिरोडा आणि तुमसर तालुक्यांच्या मधून वैनगंगेचा प्रवाह आहे. त्यापैकी तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा या गावात सध्या मंडई (जत्रा) भरलेली आहे. मंडईसाठी नदीच्या पलीकडच्या भंडारा जिल्ह्यातील उमरवाडा येथील गावकरी बोटीने (डोंगा) निघाले होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची गर्दी झाल्याने नदीच्या जोरदार प्रवाहात बोट उलटली. त्यातील सर्व गावकरी नदीच्या प्रवाहात बुडाले. स्थानिक मासेमा-यांनी धावपळ करून काही जणांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांचा नेमका आकडा उपलब्ध झालेला नाही. बुडालेल्या गावक-यांपैकी तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटवण्यात आली असून, त्यात विशाल राजेश देशकर (22 रा. गोंदिया), कैलाश तेजराम कांबळे (25 रा. तुमसर) आणि पौर्णिमा ताराचंद बागडे (14 रा. उमरवाडा) या तिघांचा समावेश आहे. सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या गावक-यांंमध्ये शांताबाई गिरडकर (50) या महिलेसह एका चार वर्षे वयाच्या मुलीचा समावेश असून, दोघींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.