नागपूर - केंद्र सरकारतर्फे देशातील २ लाख ५० हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जाणार असून यात राज्यातील २८,००६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. टप्पाटप्याने हे काम करण्यात येणार असून त्यात प्रथम ११,५२० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यात मराठवाड्यातील ३२ पंचायत समित्यांमधील २२५७ ग्रामपंचायती आहेत. बीएसएनल कंपनीकडून ऑप्टिकल
फायबर नेटवर्क टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याविषयी अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.