आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 To 400 Vulture In State, Per Year 20 Lack Spend On Conservation

राज्यात 300 ते 400 गिधाडे, दरवर्षी संवर्धनावर 20 लाखांवर खर्च !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वाघ तसेच माळढोक संवर्धनाप्रमाणेच राज्यात गिधाड संवर्धनासाठी तितकेच प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच राज्यात गिधाडांची संख्या 300 ते 400 पर्यंत गेल्याचे अनुमान वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. कॅम्पा तसेच 13 व्या वित्त आयोगातून गिधाड संवर्धनावर राज्यात दरवर्षी 15 ते 20 लाख रुपये खर्च केले जातात, असे परदेशी यांनी सांगितले.


राज्यात महाड, फणसाड, अंजनेरी व गडचिरोली या चार ठिकाणी गिधाड खानावळी आहेत. या ठिकाणी साधारणत: 15 बाय 20 फुटाचा व एक फूट उंचीचा ओटा बांधण्यात आला असून बाहेरील जनावरे आत जाऊ नयेत म्हणून तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. या ओट्यावर मेलेली जनावरे आणून टाकली जातात. या खानावळीमुळे गिधाडांना त्यांचे खाद्य मिळाल्याने त्यांच्या प्रजननात 25 ते 30 टक्क्याने वाढ झाली, असे परदेशी यांनी सांगितले. राज्यात पेंच, गोंदिया जिल्ह्याचा काही भाग, गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, बोथली, निमगाव, येवली, कारवाफा, फणसाड, महाड, अंजनेरी आदी भागात गिधाडे आहेत. पेंचमध्ये इजिप्शियन, पांढ-या पाठीची व लांब मानेची गिधाडे आढळतात.


डिक्लोफेनॅक देऊ नये
गुजर यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला. कत्तलखान्यात जाणारी भाकड जनावरे विकत घेऊन गिधाडांना खाद्य देणे हा यावरील उपाय नाही. जनजागृती हाच यावरील उपाय आहे. शेतक-यांनी गुरांना डिक्लोफेनॅक देऊ नये तसेच जनावरांना नैसर्गिक मृत्यू आल्यानंतर मेलेली जनावरे गिधाड खानावळीत आणून द्यावी, अशी जनजागृती वन विभागातर्फे करण्यात येत आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे.
ए. के. जोशी, प्रधान मुख्य वनसंरक्षक.