आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 4 Killers Get Life Imprisonment In The Case Of Monika Kiranpur Murder

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माेनिका किरणापुरेच्या हत्याकांडप्रकरणी ४ मारेक-यांना जन्मठेप,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यभर गाजलेल्या मोनिका दशरथ किरणापुरे हत्याकांडप्रकरणी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींना जन्मठेप आणि १ लाख १५ हजारांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम मोनिकाच्या आईवडिलांना देण्याचे निर्देशही दिले अाहेत.

कुणाल जयस्वाल, प्रदीप सहारे, श्रीकांत सोनेकर आणि उमेश मोहन मराठे (२४) अशी अाराेपींची नावे अाहेत. इतर दाेघांची पुराव्याअभावी निर्दाेष सुटका करण्यात अाली. नागपुरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात मोनिका तृतीय वर्षाला शिकत हाेती. १० मार्च २०११ रोजी महाविद्यालयात जात असताना तीन जणांनी तिचा भोसकून खून केला होता. शिक्षक असलेल्या कुणालचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु त्या मुलीने कुणालला नकार दिला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी कुणालने आपला मित्र प्रदीपमार्फत श्रीकांत आणि उमेश यांना १ लाख ६० हजार रुपयांत संबंधित मुलीला संपवण्याची सुपारी दिली होती. १० मार्च रोजी प्रदीप, श्रीकांत व उमेश दुचाकीवरून तेथे पोहोचले. त्यावेळी मोनिका वसतिगृहातून बाहेर पडल्याचे एका मुलीने फाेनवरून कुणालला कळविले. मात्र त्याचवेळी मोनिका ही चेहरा बांधून वसतिगृहाबाहेर पडली. तिचा पाठलाग करून श्रीकांत आणि उमेश यांनी तिच्या पाठीत वार केले व पळून गेले. मोनिकाला रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

आरोपींना द्यावी फाशीची शिक्षा
मुलीला जन्म देणे हा आमचा गुन्हा झाला. आमची मुलगी मारली गेली. आरोपी काही दिवस शिक्षा भोगून कारागृहाबाहेर येतील पुन्हा कुणाच्या मुलीचा जीव घेतील. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती. आम्ही उच्च न्यायालयात अपील करू, अशी प्रतिक्रिया मोनिकाची आई वंदना आणि वडील दशरथ किरणापुरे यांनी दिली.