आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Lacks Retired Workers Pension Struggle Very Soon Disolave

40 लाख निवृत्त कामगारांचा पेन्शन लढा निर्णायक स्थितीत - प्रकाश जावडेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - ‘महाराष्ट्रात ऑल इंडिया कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995’चे सुमारे 6 कोटी कामगार सदस्य आहेत. त्यापैकी लाखांपेक्षा अधिक निवृत्त झाले आहेत. या निवृत्त कामगारांना किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळावी, या मागणीचा लढा आता निर्णायक स्थितीत आहे. याबाबतचा अहवाल लवकरच सादर होईल, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली.

ऑल इंडिया कर्मचारी निवृत्ती वेतन समन्वय समितीच्या राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. खासगी क्षेत्रातील कर्मचारी वेतनातील 8.33 टक्के रक्कम निवृत्तिवेतन म्हणून जमा करतो, त्यात मालकाचा वाटाही 8.33 टक्के असतो. पण शासन केवळ 1.16 टक्केच रक्कम भरत असल्याने संबंधित कर्मचार्‍याला निवृत्तीनंतर तुटपुंजी पेन्शन मिळते. त्यात त्याचा उदरनिर्वाहही होऊ शकत नाही.
काय आहे मागणी?
राज्यातील निवृत्त कामगारांना किमान तीन हजार रुपये पेन्शन मिळावी, यासाठी कामगार, मालकांप्रमाणेच शासनानेही 8.33 इतकी रक्कम दरमहा जमा करावी, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून निवृत्तिवेतनधारकांचा लढा सुरू आहे. येत्या आठवड्यात याबाबतचा अहवाल सादर होऊन लवकरच या लढयाला यश मिळणार आहे असे जावडेकर यांनी सांगितले. अन्न सुरक्षा योजनेवर कोट्यवधी रुपये सरकार उधळतात, पण 40 लाख कर्मचार्‍यांसाठी 5 हजार कोटीची तरतूद करण्यात शासन अपयशी ठरत आहे, असा आरोपही त्यांनी केला.