आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

400 ग्रॅम चांदी केली हस्तगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंदिरात चोरी केल्याची कबुली देत पाखरू नामक चोरट्याने गुन्हे शाखा पोलिसांना चोरीतील 400 ग्रॅम चांदीचे दागिने परत केले आहेत. तत्पूर्वी त्याच्याकडून घरफोडीतील 84 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.
पाखरू ऊर्फ गजानन ज्ञानेश्वर भुजाडणे (रा. जेवडनगर) असे चोरट्याचे नाव आहे. पाखरूने यापूर्वी राजापेठ परिसरातील एका घरफोडीची कबुली दिली असून या चोरीतील दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. पाखरूने 20 फेबु्रवारीला गणेश मंदिरात चोरी करून मुकुट, छत्री, चांदीचे दागिने व काही रोख असा एकूण 26 हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याने चोरीची कबुली देतानाच चांदी विकल्याचे सांगितले होते. पोलिसांनी गुरुवारी 400 ग्रॅम चांदी (किंमत अंदाजे 17 हजार रुपये) जप्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन थोरात, दिलीप वाघमारे, संजय बाळापुरे, प्रणय वाघमारे, चैतन्य रोकडे, नीलेश गुल्हाने, दीपक श्रीवास यांनी केली आहे. त्यांच्याकडून अजूनही काही चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.