आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुही/नागपूर - सशस्त्र दरोडा आणि सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच संशयीतांना ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांच्या ताब्यातील संशयीतांची संख्या ८ झाली आहे.
दरम्यान, कुही भागात तणाव कायम आहे. राजकीय नेते आणि मंत्री पीडितांच्या सांत्वनासाठी येत आहेत. शक्य तेवढी सरकारी मदत देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या घटनेचे पडसाद इतरत्र पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कुही शेजारील नवरगाव, धानोली, दीपाला, चीतापूर, तारणी या गावांमध्येही स्मशानशांतता पसरली आहे.
गावक-यांचे म्हणणे आहे की, काही युवक गावात दहशत निर्माण करण्याचा काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. चोरी, मारहाण या गुन्हात आरोपी असलेल्या या युवकांबद्दल पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली होती. ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. मनोज शर्मा यांनी गावक-यांकडून आरोपींबद्दल माहीत घेतली तसेच, पोलिसांच्या ताब्यातील युवकांचीही कसून चौकशी सुरु आहे. मात्र, पोलिस अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहचलेले नाहीत.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचीही पाहाणी केली. कुही पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी पोलिस महानिरीक्षक राजेंद्र सिंह आणि पोलिस अधिक्षक डॉ. मनोज शर्मा यांच्याशी चर्चा केली.
पीडित तरुणीच्या वडीलांनी देशमुख यांना सांगितले की, मी दरोडेखोरांशी जवळपास अर्धातास मुकाबला केला. त्यांनी डोक्यात जबर वार केल्याने मी बेशुद्ध झालो. मंत्री महोदयांनी सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले. पीडित तरुणीचे शिक्षण आणि विवाहाच्या खर्चाची व्यवस्था केली जाईल असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.