आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावमध्‍ये निवासी शाळेच्या जेवणातून 77 विद्यार्थिनींना विषबाधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - मागासवर्गीय मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील 77 विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उडदाचे वरण, भात व पोळी असे जेवण झाल्यानंतर काही वेळातच मुलींना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला.

31 विद्यार्थिनींना सलाइन लावण्यात आले असून, 20 जणींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तथापि, त्यांच्या जीविताला धोका नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक दिलीप कोटेचा यांनी सांगितले. दरम्यान, समाज कल्याण अधिका-यांनी शाळेतील स्वयंपाकगृहाला सील लावले. अन्न व औषध प्रशासन सोमवारी या ठिकाणी तपासणी करणार आहे. या निवासी शाळेत सहावी ते आठवीपर्यंतच्या 200 विद्यार्थिनी आहेत. जेवणाचे कंत्राट खामगावच्या प्रतीक्षा खिल्लारे यांच्याकडे आहे.