आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्लोबलायझेशनचे कारस्थान संस्कार-संस्कृतीला घातक - फ्रांसिस दिब्रीटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपळूण - इंग्रजी भाषेच्या हव्यासापोटी मराठी भाषा वाचविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक विकासासाठी आणि जगाची संपर्क भाषा इंग्रजी असल्याने त्याला पर्याय नाही. मात्र पाश्चात्यांचे अंधानुकरण चुकीचे आहे. ग्लोबलायझेनचा हा चुकीचा प्रभाव आपल्या देशावर होत आहे. ग्लोबलायझेशनचे हे कारस्थान देशातील संस्कार आणि संस्कृती यांना घातक असल्याचे प्रतिपादन साहित्यिक फ्रांसिस दिब्रेटो यांनी केले. रविवारी त्यांच्या हस्ते ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोव्याचे आमदार, कवी विष्णू वाघ होते. दिब्रेटो म्हणाले, आपला देश बहुभाषिक असल्यामुळे येथे विविध विचारसरणींचा प्रभाव आहे. मात्र, ग्लोबलायझेशनच्या वादळात येथील संस्कृती नष्ट होत चालली आहे. याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आणि घरांमध्ये मराठी भाषा मागासलेपणाचे वाटत आहे. इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी वाचवा असे आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आजचे शिक्षणही भाषासंवर्धन करणारे नसून भरपूर पैसा मिळवून देणारे वेठबिगार निर्माण करणारे आहे. त्यामुळे जिथे संस्कृतीचे बिजारोपण व्हायला हवे तेच होत नाही. मातृभाषेतून सर्जनशिलता फुलते ती परकीय भाषेतून होत नाही. त्यामुळे भाषेच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.
परिसंवाद : पुस्तके, प्रकाशने बक्कळ; पण साहित्य कोठे?
मराठी साहित्य संमेलन; अध्यक्षपदासाठी चौरंगी लढत
साधू यांना ‘पद्मश्री विखे साहित्य जीवन गौरव’
साहित्य संमेलन: मराठीला महागाईची झळ; 25 लाखांत भागेना !