आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Thousand 200 Crores Supplementaries Accepted Within Tenth Minutes

नऊ हजार २०० कोटींच्या पुरवण्या दहा मिनिटांत मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्य सरकारच्या विविध विभागांच्या प्रलंबित योजना ३१ मार्चपर्यंत मार्गी लावण्यासाठी नऊ हजार २०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना बुधवारी विधानसभेत दहा मिनिटांत मंजुरी देण्यात आली. पुरवणी मागण्यांवर दोन दिवस सभागृहात चर्चा झाली होती. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र तृतीय पुरवणी विनियोजन विधेयक २०१४ सभागृहात मंजुरीसाठी मांडले. त्यावेळी आमदार गोपाळदास अग्रवाल यांनी पाच महिन्यांसाठी आमदार निधी फक्त ५० लाख दिला असून तो एक कोटी करावी अशी मागणी केली. तेव्हा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असूनही ५० लाख रुपये आमदार निधी देत असल्याचे सांगत २५-१५ चा जो पायंडा मागील सरकारने पाडला आहे त्याअंतर्गत योजना राबवण्यात येणार असून आमदार आणखी २५ लाख रुपये खर्च करू शकत असल्याने सदस्यांनी कामाची काळजी करू नये, असे सांगितले. पुरवणी मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आता गारपीटग्रस्तांना मदत जाहीर करावी लागणार असल्याने राज्याच्या तिजोरीवर चांगलाच भार पडणार आहे. त्यामुळे केंद्राच्या मदतीकडे राज्य सरकारला डोळे लावून पाहावे लागणार आहे.