आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यह स्वर्गसम संसार हो, हजारो सर्वधर्मीयांनी घडवले एकात्मतेचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पाठीचा कणा ताठ करून डोक्यावर भगवी टोपी घेऊन पद्मासनात बसलेल्या विदर्भातील हजारो उपासकांनी शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी सायन्सकोर मैदानात राष्ट्रीय सामुदायिक प्रार्थना घेतली. चंद्राच्या शीतल प्रकाशात प्रार्थनापीठावरील मिणमिणत्या दिव्याकडे तोंड करून ‘है प्रार्थना गुरूदेव से यह स्वर्गसम संसार हो’ अशी एका सुरात प्रार्थना म्हणत सर्वधर्मांच्या समाजबांधवांनी राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले.

वर्धा जिल्ह्यातील श्रीगुरूदेव सेवाश्रम आष्टी (शहीद) यांच्या वतीने ग्रामजयंती निमित्त राष्ट्रीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म समन्वय एकात्मता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यांतील श्रीगुरूदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शांतता प्रस्थापित व्हावी
सर्व धर्मांमध्ये समन्वय साधून विश्वात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती मास म्हणून साजरा व्हावा, यासाठी राष्ट्रीय सामुदायिक प्रार्थना घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही प्रार्थन घेण्यात येणार आहे दिल्ली येथे या उपक्रमाचा समारोप होईल, अशी माहिती एका श्रीगुरूदेव कार्यकर्त्याने दिली आहे.

राष्ट्रसंतांच्या ग्रंथांचा स्टॉल
राष्ट्रसंततुकडोजी महाराज यांची भजने, चरित्र विविध पुस्तके कार्यक्रमस्थळी विक्रीसाठी उपलब्ध होती. प्रार्थनेची पुस्तके, भगवी टोपी, माळा राष्ट्रसंतांच्या मूळ आवाजातील भजनांच्या कॅसेट्स नागरिकांनी या वेळी खरेदी केल्या.

प्रार्थना पीठावर होती विविध धर्मगुरूंची उपस्थिती
सामुदायिकप्रार्थनापीठावर सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते. भिख्खू महापंथ महाथेरो, फादर रूपेश डाबरे, हाफीज मसूद अख्तर साहब, बलवंतसिंग जुनेजा, जीवनकुमार गोरे, प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्व धर्मांची समन्वयक भूमिका या वेळी मान्यवरांनी मांडली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य आणि विचारांवर प्रकाश टाकला.