आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Chosing Candidate Among People Against Gadkari

आम आदमी पक्ष गडकरींविरोधात लोकांमधूनच निवडणार उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात दमदार उमेदवार उभा करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने नागपूरकरांची इच्छा लक्षात घेऊनच उमेदवाराची अंतिम निवड केली जाणार आहे. त्यासाठी नागपूरकरांकडूनच पर्याय मागवले जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
लोकसभेत नागपुरात नितीन गडकरी आणि विलास मुत्तेमवार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. या बिग फाइटमध्ये आम आदमी पार्टी नेमके कोणाला रिंगणात उतरवणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या अंजली दमानिया यांचे नाव मध्यंतरी चर्चेत होते. मात्र, आपल्या नावाची चर्चा गैरसमजातून झाली, असे स्पष्ट करताना आपली तशी कुठलीही योजना नसल्याचे दमानिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. आम आदमी पक्षाच्या राज्य शाखेने उमेदवार निवडीची प्रक्रिया निश्चित केली आहे.
उमेदवार लादण्यापेक्षा स्थानिक लोकांच्या भावना जाणून घेऊन उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारीसाठी लोकांकडून ‘आप’च्या वेबसाइटवर प्रस्ताव मागवले जाणार आहेत. त्या नावांवर लोकांकडून आक्षेप, पसंती मागवली जाणार आहे. काही नावे निवडल्यावर त्यातून लोकांच्याच पसंतीनुसार उमेदवाराची अंतिम निवड होईल, असे दमानिया यांनी सांगितले.