आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AAP Chief Kejriwal Says Media Is Paid For Praising To Narendra Modi

सत्तेत आल्यानंतर विकाऊ पत्रकारांना तुरुंगात टाकू; केजरींची धमकी, नंतर U-TURN

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी माध्यामांवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमधील डीनर पार्टीमध्ये केजरीवाल यांनी, जर आमची सत्ता आली तर पैसे घेऊन मोदींचा प्रचार करणा-या माध्यमकर्मींना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. मात्र नंतर त्यांनी पलटी मारली आणि मी असे बोललोच नाही, असे म्हणाले.
केजरीवाल म्हणाले, 'संपूर्ण मीडिया विकला गेला आहे. मोदींचा प्रचार कण्यासाठी न्यूज चॅनल्सनी मोठी रक्कम घेतली आहे. सध्या मीडियाच्या माध्यमातून देशभरात मोठे षडयंत्र आखले जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये गुजरातमध्ये 800 शेतक-यांनी आत्महत्या केली. एकाही चॅनलने ही बातमी कव्हर केलेली नाही. उलट गेल्या एक वर्षांपासून मीडिया मोदींच्या नावाचा जप करीत आहे.'
नागपूरमध्ये डीनर पार्टी
राज्याच्या दौ-यावर असलेले केजरीवाल गुरुवारी रात्री नागपूरमध्ये दाखल झाले. उपराजधानीतील तुली इंटरनॅशनल या तारांकित हॉटेलात प्रत्येकी दहा हजार रुपये मोजून ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत शहरातील सुमारे 150 देणगीदारांनी गुरुवारी रात्री भोजन घेतले. तर दुसरीकडे, हा प्रकार नौटंकी असल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यासाठी या हॉटेलबाहेरच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्टॉल लावून दहा रुपयांत ‘आम आदमी’चे जेवण उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे केजरीवालांच्या ‘शाही’ व हॉटेलबाहेरील ‘आम’ जेवणाची चर्चा रंगली होती.
मुंबईत एफआयआर दाखल
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विमानतळावर विनापरवानगी गर्दी गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आज केजरीवाल यांचा नागपूरमध्ये रोड शो
अरविंद केजरीवाल यांच्या रोड शो ला आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता छत्रपती चौकातून सुरुवात झाली. यात मोठ्या संख्येने तरुणांनी गर्दी केली आहे. बाइकवर स्वार होऊन आम आदमी पार्टीचा झेंडा हातात घेऊन तरुण रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत. आज ते नागपूरच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये भेटी देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कस्तूरचंद पार्क येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेत ते कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काळे झेंडे दाखवून निषेध