आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aap Wont Have Much Effect In New Delhi Says Nitin Gadkari

दिल्लीत ‘आप’चा प्रभाव नाही, नितीन गडकरींचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दिल्लीत आम आदमी पक्षाचा (आप) कुठलाही प्रभाव नाही. त्यांचा प्रभाव फुगवून सांगितला जातोय. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या चारित्र्यवान व्यक्तीचे नाव जाहीर केल्याने ‘आप’च्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील मुद्दाच संपुष्टात आला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात केला.

गडकरी म्हणाले, भ्रष्टाचार, महागाई, महिलांची सुरक्षा हे दिल्लीच्या निवडणुकीचे मुद्दे आहेत. भ्रष्टाचाराचे सारे रेकॉर्ड दिल्ली सरकारने तोडले. पाच लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला. तेथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही नाही. त्यामुळे जनतेत सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. भाजपने दिल्लीच्या विकासासाठी सकारात्मक कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूरप्रमाणे दिल्लीतही चोवीस तास पिण्याच्या पाण्याची योजना राबवणार असून त्यासाठी यमुनेच्या पाण्याचा वापर होणार आहे, असे त्यांनी सांगितले. ‘आप’चा प्रचार भ्रष्टाचाराविरोधात आहे. भाजपने डॉ. हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केल्याने हा मुद्दाच निकाली निघाला असल्याचे ते म्हणाले.
आहे. प्रभावाविषयी फुगवून सांगितले जात आहे, कारण नवीन पक्ष सहा महिन्यात तयार होत नाही. त्यात काही अंशी मीडिया देखील जबाबदार असल्याचे ते म्हणाले. भाजपचे नेते विजय गोयल यांची नाराजी राहिलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

छत्तीसगड, मध्य प्रदेशात भाजप सत्ता कायम राखणार असून दिल्ली आणि राजस्थान नव्याने काबीज करणार, असा दावाही त्यांनी केला. बिहारमधील बॉम्बस्फोटाच्या घटना दुदैवी असून तेथे कायदा आणि सुव्यवस्था नावालाही शिल्लक नाही, असे ते म्हणाले.
चौकट..
नागपुरातूनच लढणार
केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे ठरले असे सांगताना गडकरी म्हणाले की, माझ्यावर छुपे वार करण्यात आले. मी नेहमीच खुली लढाई लढतो. आगामी लोकसभा निवडणूक नागपुरातूनच लढणार, याचा पुनरूच्चार देखील गडकरी यांनी केला.