आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर अभियंत्याकडे एक कोटीची मालमत्ता, गडचिराेली जिल्ह्यात ‘एसीबी’चे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - रोजगारहमी योजनेच्या कामाची देयके मंजूर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणारे गडचिराेली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीचे शाखा अभियंता मनोज मोटघरे यांच्या घरांच्या झडतीत सुमारे एक कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली. यापैकी बेहिशेबी मालमत्ता किती याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अभियंता मोटघरे यांना लाच स्वीकारताना पकडले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दोन पथकांनी त्यांच्या नागपूर आणि आरमोरी येथील घरांची झडती घेतली. यादरम्यान त्यांच्याकडे रोख २० लाख रुपये, १३० ग्रॅम सोने, सात लाख रुपयांच्या मुदत ठेवी, वर्धा मार्गावर सुमारे २२ लाख रुपये किमतीचे तीन भूखंड, स्वत:च्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात २३ लाखांची रक्कम घरगुती साहित्य अशी २४ लाखांवर मालमत्ता आढळून आली. आरमोरी, धानोरा आणि नागपूर येथे मोटघरे यांची घरे आहेत. नागपूर आणि आरमोरी येथील त्यांची मालमत्ता एकूण एक कोटी एक लाखांच्या घरात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आले आहे.
यापैकी बेहिशेबी मालमत्ता किती, याचा हिशेब काढला जात असल्याचे पोलिस उपअधीक्षक रोशन जाधव यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...