आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यात अपघात, दोन जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- लक्झरी बसने मालवाहू जीपला धडक दिल्याने दोन जण ठार झाले. मंगळवारी सकाळी बाळापूर तालुक्यातील कान्हेरी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. मालवाहू जीप अकोल्याहून बाळापूरकडे चालली होती, याच वेळी समोरून आलेल्या बसने जीपला जोराची धडक दिली, त्यात जीप चालक बबलू नृपनारायण (वय 40, रा. बोरगाव) आणि क्लिनर अब्दुल तैसिब अब्दुल रऊफ (24 रा. बोरगाव) हे दोघे ठार झाले. अपघातातील इतर जखमींना परिसरातील नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.