आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरमध्ये ट्रक आणि सफारीची भीषण धडक; सहा ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरातील कोंढाळीजवळ आज (बुधवारी) सकाळी साडे सहाच्या सुमारास सफारी गाडीला समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेले सर्वजण अलाहाबाद येथील असून त्यात समाजवादी पक्षाच्या नेत्याचा समावेश आहे. सर्व मुंबईहून उत्तरप्रदेशात जात होते.

पोलिस सूत्रांनुसार, नागपूर- अमरावती महामार्गावर कोंढाळी गावापासून सात किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. सफारी गाडीतील सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी झाले. एकाला नागपूर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असून अन्य दोघांवर कोंढाळी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे पुढील प्रमाणे- नरेंद्र रामकिरण सिंग (45), प्रतिभा बुधासिंग (69), धनराज सिंग यादव (70), नरेश कुमार यादव (समाजवादी पक्ष नेते), प्रिया बुद्धदेव सिंग (8), प्रतिक बुद्धदेव सिंग (10)