आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यात अपघात; कंटेनरच्या धडकेने 13 जण ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या ‘टाटा एस’ला लोखंडी पिलर घेऊन जाणा-या कंटेनरने समोरून धडक दिल्याने 13 जण ठार झाले. नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील नेर परसोपंतजवळ (जि. यवतमाळ) बुधवारी दुपारी हा भीषण अपघात झाला.

वाशिम जिल्ह्यातील मोख (ता. रिसोड) येथील मोरे परिवारातील 32 सदस्य टाटा- एस या खासगी वाहनातून वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव येथील एका मंदिरात नवसपूर्तीसाठी जात होते. दरम्यान, बुधवारी दुपारी साडेसारच्या सुमारास चालक सुभाष किसन मोरे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणारा भरधाव कंटेनर त्यांच्या वाहनावर धडकला. या भीषण अपघातात टाटा- एस हे वाहन चक्काचूर झाले. चालक मोरे दोन्ही वाहनांमध्ये दबल्यामुळे त्यांच्यासह 13 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना वाशिम, यवतमाळ, कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.